नंदुरबार l प्रतिनिधी
प्लॉट विक्री करायचा आहे, असे दाखवून विश्वास संपादन करीत नंदुरबार येथील एकाची 13 लाख 85 हजारात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन चिमणलाल शाह यांनी दि.2 डिसेंबर 2020 ते दि. 15 मे 2022 पर्यंत जयंतीलाल भिलचंद कासार व साक्षीदार यांना 60 लाख रूपये किंमतीची माटुंगा मुंबई येथील 468 स्केआर प्लॉट दाखवला.
जयंतीलाल कासार यांच्याकडून टोकन म्हणून 50 हजार रूपये घेतले तसेच घनश्यामसिंग यांच्या बँक खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून 15 लाख रूपये पाठविले. प्लॉटचा ताबा न मिळाल्याने जयंतीलाल कासार यांनी राजन शाह यांना वेळोवेळी पैशांची मागणी केली.त्यानंतर त्यांना 1 लाख 65 हजार रूपये परत करण्यात आले. मात्र त्यांची उर्वरीत 13 लाख 85 हजार रूपये मागणी करूनही परत न करता फसवणूक केली म्हणून जयंतीलाल भिलचंद कासार रा.वृंदावन कॉलनी (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून राजन चिमणलाल शाह रा.गिरीविहार सोसायटी (नंदुरबार), घनश्याम राजदेवसिंग रा.चेंबर मुंबई यांच्याविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.