नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील डाब जवळ चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चालकाविरूध्द मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जहांगीर पाडवी व इतर नागरीक चिवलउतार या गावाहून लग्न करून परतांना महेंद्रमॅक्स गाडी (क्र.एम.एच.३५ ई.१८७२) या वाहनात बसून सरी या आपल्या गावी परत असतांना अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावाजवळ असलेल्या नदी पुलाजवळील चढावर चालकाने भरधाव वेगाने चालविले. यात वाहन हे रस्त्याच्या कडेला पलटले. या अपघातात गणेश जहांगीर पाडवी, गणपत माकत्या वसावे, भुमिका नोबल्या वसावे, दुर्गा मोग्या वसावे, वैशाली धर्मा वसावे सर्व रा.सरी (ता.अक्कलकुवा), निशा सायसिंग वसावे रा बिजरीपाटी ता.अक्कलकुवा यांना दुखापत झाली. याप्रकरणी गणेश जहागीर पाडवी रा.सरीचापाटीलपाडा ता.अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून विजय मोग्या वसावे रा.वेरीचा चनवाईपाडा ता.अक्कलकुवा याच्या विरूध्द भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ सह मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हे.कॉ. दिपक बुंनकर करीत आहेत.