नंदुरबार | प्रतिनिधी
पथराई गावात बंद घरात धाडसी घरफोडी झाली असून पावणेपाच लाखाचा ऐवज लांबविण्यात आला आहे. या घरफोडीमुळे पथराई शिवारात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सुचंनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील पथराई गावातील शहरातील जगदिश गोविंद पाटील हे बाहेरगांवी गेले असल्यामुळे त्यांचे घर बंद असल्याचे साधत चोरटयांनी दरवाजाचा कडीकोंडी तोडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून साडेतीन लाखाची रोकड ४८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कर्णफुले, ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे चैन असा एकूण ४ लाख ७८ हजार ऐवज चोरून नेला. घरफोडीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे रविंद्र कळमकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, प्रशांत राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसेतज्ञांनीही घटनास्थळावरून संशयीतांचे ठसे घेतले. जगदिश गोविंद पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोटयांविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ५५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.