नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा येथे बिरसा फायटर्सची नाशिक विभागीय बैठक उत्साहात पार पडली.
नाशिक विभागीय बैठक तळोदा येथे बिरसा फायटर्स संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार
पावरा यांच्या आदेशानुसार तळोदा तालुक्यातील नाशिक विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे अध्यक्ष सुशिलकुमार पावरा तर बैठकीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी क्रीडा मंत्री ॲड.पद्माकर वळवी,मनोज पावरा राज्य अध्यक्ष बिरसा फायटर्स, राजेंद्र पाडवी राज महासचिव बिरसा फायटर्स,विलास पावरा नाशिक विभागीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स धुळे,
राकेश वळवी तालुकाध्यक्ष बिरसा फायटर्स नवापूर,भरत पावरा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स नंदुरबार,गणेश खर्डे कार्याध्यक्ष बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा,जालिंदर पावरा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार जिल्हा,विजय साहरे कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा यांच्यासह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
नाशिक विभागीय बैठक तळोदा येथील आदिवासी समाजातील समस्या सोडविण्यासाठी व न्यायसाठी चर्चा करण्यात आली व पुढील जाऊन आदिवासी समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असे अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली
कारण आदिवासी समाजवर अन्याय, अत्याचार करत आले आहेत तरी आदिवासी समाज सहन करत आला आहे.
आदिवासी समाजाने आपले जल,जंगल, जमीन या तीनही गोष्टी जपून ठेवलता पाहिजेत, समाजाचे अस्तित्व या तीन गोष्टीशी जुळलेले आहे तर आदिवासी हे सर्व समाजाशी ऐकता करून एकजुटीने या समाजाला जागरुक करा असे प्रतिपादन माजी क्रीडा मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी केले. यावेळी बिरसा फायटर्स नाशिक विभागीय बैठकिस पदाधिकारी व जिल्हा तालुका पदाधिकारी व सदस्य मोठे संख्येने उपस्थित होते.