नंदूरबार l प्रतिनिधी
बुध्द पौर्णिमेला होणाऱ्या प्राणी गणनेच्या पार्श्वभूमीवर तळोदा वन विभागाने सुसज्ज तयारी केली असून यासाठी वाल्हेरी, बन,तुळाजा व अलवान अशा चार ठिकाणी मचान उभारण्यात आले आहेत.शिवाय १३ कर्मचारी देखील तेथे तैनात करण्यात आले आहे. कोरोना मुळे तब्बल दोन वर्षे प्रण्यानांची गणना करणे बंद होते.या दोन वर्षांच्या खंडा नंतर यंदा वन विभागाकडून गणना करण्यात येणार आहे.साहजिकच वन्य प्रेमींना उत्सुकता लागली आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण राज्यात वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांची नेमकी किती संख्या आहे.हे जाणून घेण्यासाठी प्राणी गणना केली जात असते.कारण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आकाशात प्रचंड उजेड पडतो.त्याचा या शुभ्र प्रकाशात प्राण्यांचा पायाचे ठसे जमिनीवर स्पष्ठ उमटतात.साहजिकच प्राणी,पक्षी यांची गणना अचूक करता येते.वरिष्ठ कार्यालयाचा आदेशा नुसार तळोदा वन विभागाने देखील आपल्या कार्यक्षेत्रातील वाल्हेरी,बन, तूळाजा, अल्वान या वनक्षेत्रातील प्राण्याची गणना करण्यासाठी सुसज्ज अशी तयारी केली आहे.यासाठी या चारही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मचान देखील उभारण्यात आले आहेत.त्याचबरोबर १० वनरक्षक,३ वणपाल असे १३ करमचारी तैनात करण्यात आले आहेत.ही गणना १६ तारखेच्या मध्यरात्री पासून तर १७ च्या सकाळ पर्यंत करण्यात येणार आहे. मेवासी वन विभागाचे उप वनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी प्राणी गणना व पक्षांची नोंद कशी करावी याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे. दोन वर्षाच्या खंडा नंतर प्रथमच या प्राणी,पक्षांची मोजणी होणार असल्याने वन्य जीव प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान तळोदा वन क्षेत्रात बिबट,अस्वल, तरस,कोल्हे,रान पिंगळा,मोर अशा प्रजातीचे प्राणी,पक्षी आहेत.आता पर्यंत त्यांचा अधिवास देखील दिसून आला आहे.