नंदुरबार | प्रतिनिधी
केतकी चितळे यांनी सोशल मिडीयावर खा.शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. तीच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नंदुरबार शहर राष्ट्रवादीतर्फे शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मोहिते यांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहर पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केतकी चितळे यांनी खा.शरद पवारांवर खालच्या पातळीवर जावुन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन खा.शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. चुकीची पोष्ट टाकून देशाच्या जेष्ठ नेत्यांबद्दल असे शब्द वापरले जातात ही चुकीची बाब असुन. केतकी चितळेवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर रित्या गुन्हा नोंदवियात यावा अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगताप, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी जोशी, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष लल्ला मराठे, महिला शहराध्यक्ष उषाबाई वळवी, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, जयेश मोरे, सुनिल राजपूत, कालु पहेलवान, सुरेश वळवी आदी उपस्थीत होते.