म्हसावद l प्रतिनिधी
पत्रकारिते सोबतच सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहादाचे प्रांताधिकारी डॉ चेतन गिरासे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि शाल व श्रीफळ देऊन सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार डॉ.सतिष पाटील यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी शहादाचे तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय जी पवार, शहादाचे डी.वाय.एस.पी. श्रीकांत घुमरे, शहादा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे, शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, म्हसावद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सारंगखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत , अध्यक्ष नरेंद्र बागले, सचिव कमलेश पाटील तसेच शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बंधु उपस्थित होते.