नंदुरबार| प्रतिनिधी
खेतिया येथील व्यापार्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून एका तरूण आणि तरूणीने साडेसहा लाख रूपये लांबविल्याची घटना शहरातील डोंगरगाव रस्त्या लगत डॉ.कुलकर्णी हॉस्पिटलच्या समोर घडली. याप्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसाचे व्यापारी संतोष कोठारी हे दुचाकीच्या डिक्कीत सोडसहा लाख रूपये घेवून पेमेंट देण्यासाठी डोंगरगाव रस्त्यावरून जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या तरूण आणि तरूणीने त्यांची दुचाकी अडवून तुला गाडी चालवता येत नाही का? असे म्हणत हुज्जत घातली. त्यानंतर तरूणाने दुचाकीची चाबी काढून तरूणीच्या हातात दिली. तरूणीने व्यापारी कोठारी यांना गाफिल ठेवून त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडली. चावी घेवून पुढे चालू लागते. त्यांच्याकडून चाबी घेण्यासाठी कोठारी त्यांच्यामागे गेल्यावर लगेच दुचाकीच्या डिक्कीतील साडेसहा लाख रूपये ठेवलेला पिशवी तरूणीने हातचलाखीने लंपास केले.चाबी दिल्यानंतर कोठारी दुचाकी घेवून निघत असतांनाच एका दुकानदाराने डिक्कीतून पिशवी काढून नेल्याचे सांगितले. त्यानंतर लुटीचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर कापसाचे व्यापारी संतोष भवरलाल कोठारी रा.खेतिया,ता.पानसेमल यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात तरूण,तरूणी यांच्या विरूध्द भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र पाटील करीत आहेत.