नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील कॉपर वायरची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आली असुन ८ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली असुन त्याच्या ताब्यातुन १ लाख ३५ हजार रुपये किमंतीच्या मुद्देमालासह जप्त करीत ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.या चोरीतील ४ संशयीत आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि .१० मे रोजीच्या रात्री बलवंड गावाच्या शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर येथून १ लाखाचे पवन चक्कीत वापरात येणारी ५२५ मीटर ताब्यांची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने वना भावराव पाटील यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता . तसेच दि . ११ मे रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ढंढाणे गावाचे शिवारादेखील सुझलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवर मधील ट्रान्सफॉर्मर बॉक्समधून १० हजाराची ताब्यांच्या बसबार पट्टया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने तुकाराम सुकदेव झावरे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता . तसेच दि . १२ मे रोजी तिलाली शिवारातील टॉवर मधून २५ हजाराची ५० मीटर तांब्याची वायर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने राजेंद्र चिंतामण पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली , गुन्हयातील चोरीस गेलेली ताब्यांच्या बसबार पट्टया ह्या रजाळे येथील पवन ऊर्फ प्रशांत कोळी व त्याचे मित्र यांनी मिळून चोरी केल्या आहेत .सदर बातमी मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन गुन्ह्यात सहभाग असलेले सर्व आरोपी व गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल विकत घेणारे यांची माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले . मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ रजाळे व ढंडाणे येथे पाठवुन संशयीतास ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रजाळे गावात संशयीत आरोपी पवन कोळी याचा शोध घेतला असता तो त्याच्या शेतातुन पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी, सुकदेव आंनदा कोळी, शेरसिंग ऊर्फ पिन्या चंदु टाकरे तीघे रा . ढंढाणे, ता.नंदुरबार असे सांगीतले . त्यांना सुझलॉन तार चोरी बाबत विचारपुस केली त्यांनी दि.११ मे रोजी ढंडाणे गावाचे शिवारातील सुझलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवरमधील ट्रान्सफॉर्मर बॉक्समधून चोरी केल्याचे मान्य केल्याने पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी यांच्याकडून १० हजार रुपये किंमतीचे ताब्यांच्या बसबार पट्ट्या कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केले . सदर संशयीत आरोपींकडे अधिक विचारणा केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह इतर काही गुन्हे केले असल्याचे कबुल करुन त्याच्या इतर साथीदारांबाबत माहीती दिली . त्यामुळे त्यांचे साथीदरांपैकी देविदास भाईदास भिल , रा . शनिमांडळ ( तिलाली ) , हिरामण भिल , रा . तिलाली , ता . नंदुरबार, आनंदसिंग भिल , रा . बलवंड , रविंद्र भिल , रा . तिलाली , ता . नंदुरबार यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले . संशयीतांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्यात चोरी केलेली तांब्याची तार ही दोंडाईचा येथील सईद मुसा खाटीक यास विकल्याचे सांगितले . त्यामुळे दोंडाईचा येथ सईद मुसा खाटीक रा.राणीपुरा होळी चौक , दोंडाईचा यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले . त्यास विचारपुस केली असता त्याने देविदास भिल व त्याचे इतर साथीदार यांच्याकडून विकत घेतलेली १ लाख रुपये किंमतीचे पवन उर्जा टॉवरमध्ये वापरात येणारी ४३२ किलोग्रॅम वजनाची एकुण -९ बंडल तांब्याची तार स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केले . संशयीत आरोपीपैकी पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी यास सुझलॉन कंपनीच्या तांब्याची तारेच्या चोरीच्या गुन्ह्या संदर्भात अधिक विचारपुस करता त्याने कबुली दिली की , त्याने स्वतः व त्याचे साथीदार देविदास भाईदास भिल , रा . शनिमांडळ ( तिलाली ), अशोक वडार , रा . ढंढाणे , ता . नंदुरबार , मोग्या भिल , रा . ढंढाणे, ता. नंदुरबार अशांनी मिळून तिलाली गावाचे शिवारातील सुझलॉन पवन चक्की येथून ५० मीटर तांब्याची तार चोरी केल्याची कबुली दिली .त्यांच्याकडुन २५ हजार रुपये किंमतीचे पवन चक्कीत वापरात येणार्या ताब्यांच्या तारेचे ५० किलोग्रॅम वजनाचे १ बंडल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केले . अशा प्रकारे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आणले. ८ संशयीत आरोपींनी अटक करून एकूण १ लाख ३५ हजार रुपये किंमतीची ४८२ किलोग्रॅम वजनाची सुजलॉन पवन उर्जा कंपनीचे टॉवर मधुन चोरी केलेली तांब्याची तार तसेच ताब्यांचे बसबार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . गुन्ह्यातील राहुल कोळी , रा . रजाळे, लोटन पाटील , रा . बलवंड, अशोक वडार , रा . ढंढाणे , ता . नंदुरबार, मोग्या भिल , रा . ढंढाणे , ता . नंदुरबार असे ४ आरोपी अद्याप फरार आहेत . त्यांना देखील लवकरच शोध घेऊन अटक करण्यात येणार आहे . सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे , महेंद्र नगराळे , पोलीस नाईक राकेश मोरे , पोलीस अमंलदार अभय राजपुत , आनंदा मराठे , शोएब शेख चापोना रमेश साळूंखे यांचे पथकाने केली आहे .