Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे :पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे खरीप हंगाम आढावा बैठकीत निर्देश

team by team
May 14, 2022
in राजकीय
0
खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे :पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे खरीप हंगाम आढावा बैठकीत निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रधुनाथ गांवडे, कृषी सभापती गणेश पराडके, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल.डी.भोये, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. पाडवी म्हणाले की, खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणारे बियाणे चांगल्या दर्जाची असावे. राष्ट्रीय कृत बॅकांनी कृषी कर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे. 127 हेक्टर क्षेत्रात एंरडी लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रासायनिक खते विक्रेत्यांनी पीओएस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे, खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. युरीयाचा वापर कमी होण्यासाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी प्रत्येक दुकानात नॅनो युरिया वापरा बाबतचे जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. ठिबक सिंचन क्षेत्र वाढवावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा व गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करावी. वीज जोडणी पूर्ण करावी, शेतकऱ्यांच्या मागणी नुसार खताच्या बियाणे विक्रेत्यांनी उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खताचा कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणु खते वापरण्यासाठी जनजागृती करावी.
यावेळी श्री.भागेश्वर म्हणाले की, खरीप हंगाम 2022 साठी भात,मका,ज्वारी,बाजरी,सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी 23 हजार 377 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर बी.टी कापूस बियाण्यासाठी 6 लाख 25 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 3 हजार 30 मे.टन युरिया व 590 मे.टन डि .ए.पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 34 हजार 800 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

तऱ्हाडी ते शहादा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post
जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या काही कुत्र्यांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव तो रोखण्यासाठी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add