नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत घरफोडी करीत चोरट्याने सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील अल्ताफ अब्दुल रेहमान ईसानी यांचे गरीब नवाज कॉलनीत दुमजली घर आहे. सदर घराच्या खिडकीचे ग्रीलच्या सहाय्याने चोरट्याने वरील मजल्यावरील घरात प्रवेश केला. घरात असलेल्या लाकडी कपाटातून ५ लाख ४२ हजार रुपये किंमतीचे मनगटी घड्याळे व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरुन नेला. याबाबत अल्ताफ अब्दुल रेहमान ईसानी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महाजन करीत आहेत.