नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथील एकाने ११२ नंबर डायल करुन लोकसेवकास खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील बागवान गल्लीतील रहिमली नादीराली सैय्यद याने शासकीय तक्रार सुविधा डायल ११२ या क्रमांकावर कुठलीही तक्रार नसतांना नंदुरबार नियंत्रण कक्षास संदेश पाठवून लोकसेवकास खोटी माहिती दिली. याबाबत पोहेकॉ.सुरेश कोकणी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात रहिमली नादीराली सैय्यद याच्याविरोधात भादंवि कलम १८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकूर करीत आहेत.