नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे हद्दपारीचे आदेश असतांनाही घरी आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील आझाद विठ्ठल ठाकरे यास नंदुरबार जिल्हा हद्दीतून एक वर्ष कालावधीसाठी हद्दपार केले असतांनाही हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन डामरखेडा येथे घरी आढळून आला. याबाबत पोना.विकास कापुरे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात आझाद विठ्ठल ठाकरे याच्याविरोधात भादंवि कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राम वळवी करीत आहेत.