नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्रॉफ स्पोर्ट्स क्लब, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने मधली सुट्टी उन्हाळी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.५ ते २० मे दरम्यान हि.गो.श्रॉफ हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये कला व क्रीडा यात फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ,बॉक्सिंग प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यात आज लाठी काठी चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी राजेश शाह, संजय माळी, सागर माळी, अभय माळी यांनी लाठीकाठी प्रशिक्षण दिले.या या प्रशिक्षण शिबीर यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी,शिवाजी माळी, जितेंद्र माळी,परिश्रम घेत आहेत.