नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल कर्नाटक राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे सोमवार दि. 16 मे रोजी विजयपूर येथे भव्य वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खानदेशसह महाराष्ट्रातील गवळी समाज बांधवांनी आंतरराज्यीय वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आजच्या धावपळीच्या युगात लग्नाच्या उंबरठ्यावरील मुला-मुलींच्या पालकांना अपेक्षित स्थळ शोधण्यासाठी कसरत करावी लागते. समाजबांधवांची अडचण दूर करण्यासाठी कर्नाटक गवळी समाजातर्फे प्रथमच आंतर राज्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.16 मे रोजी सकाळी दहा वाजता कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील सिद्धेश्वर भवन येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन होईल. या मेळाव्यात वधु-वरांची नोंदणी निशुल्क असून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलंगाना, गोवा, मध्य प्रदेश, राज्यातील गवळी समाज बांधवांनी मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कर्नाटक राज्य लिंगायत गवळी समाज आणि महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे आणि सचिव अशोक यादबोले यांनी केले आहे.