नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील संजय निराधार योजनचे लाभार्थी यांना हयातीचा व उत्पन्नाच्या दाखल्या वन वन भर उन्हात भटकावे लागत आहे व गरीब नागरीकांना पैसा पण खर्च करावा लागत आहे.यासाठी नवापूर शहरातील संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष दामू बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वात नवापूर तहसिल कार्यालयात नवापूर तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार योजनचे सर्व लाभार्थी यांनी जाऊन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांची भेट घेतली.
या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष दामू बिऱ्हाडे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थांच्या समस्या मांडल्या.त्यांनी सांगीतले की, संजय गांधी निराधार योजनचे लाभार्थी यांनी अगोदर २१ हजाराचे उत्पन्नाचे दाखले दिलेले आहे.पंरतु शासनाने उत्पन्नाचे दाखले २१ हजाराचे द्यायचे किवा ५० हजाराचे द्यायचे असे शासनाच्या जी आर मध्ये कुठेही म्हटले नाही.यावर तुम्ही तोडगा काढावा असे सांगितले यावर तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी मी वस्तुस्थिती तपासुन उत्पन्नाचे दाखले देण्याबाबत तलाठ्यांना सुचना देण्यात येतील असे सांगितले. यावेळी नवापूर तालुक्यातील असंख्य संजय गांधी निराधार योजनचे लाभार्थी तहसिल कार्यालयात उपस्थित होते.यावेळी नवापूर कॉग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रहेमतखा पठाण,शहर अध्यक्ष सोहेल बलेसरीया,उपशहरअध्यक्ष जगदीश पाटील,तुराब पठाण,असद कुरेशी,आनंदा आतारकर,फारुक पठाण,धनसुख जोशी,योगेश खैरनार ,फैजल शेख आदी उपस्थित होते.








