खापर l प्रतिनिधी
जैन समाजाचे 24 तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी सुमारे 2600वर्षा पूर्वी वैशाख सुदी 11 ह्या दिवशी भगवान महावीर स्वामी यांनी सदुपदेशुन मनुष्य ला सर्वविरति – देशविरति धर्माचा उपदेश दिला आणि चतुर्विध संघाची (शासन) ची स्थापना केली. या निमित्ताने अक्कलकुवा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प.पू. खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरिश्वरजी महाराजा यांची आज्ञानुवर्तिनी पार्श्व मणि तीर्थ प्रेरिका गच्छ गणिनी श्री सुलोचना श्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या प.पू. श्री प्रियसौम्यांजनाश्रीजी म.सा., प.पू. साध्वी श्री प्रियज्ञानांजनाश्रीजी म.सा., प.पू. साध्वी श्री प्रियदक्षाजंनाश्रीजी म.सा.
आदि ठाणा 3 यांचा पावन निश्रेत सकाळी 7 वाजेला श्री वासुपूज्यस्वामी जिनमंदिर येथे महा अभिषेक करण्यात आले. पश्यात जैन आराधना भवन येथे सामूहिक सामायिक व प्रवचन च्ये आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प.पू. साध्वी श्री प्रियसौम्यांजनाश्रीजी म.सा. यांनी भगवान महावीरस्वामी यांचा जीवन चरित्रा वर प्रवचन दिले भगवान महावीर यांचे पाच ही कल्याणक बाबत माहिती देत सांगितले की भगवान महावीर यांनी दिलेले अनमोल असे उपदेश मानवाने त्यांचे पालन केले तर मानव जीवन हा सार्थक होणार तसेच शासन दिवस निमित्ताने विशेष प्रवचन साध्वीजी यांनी दिले पश्च्यात प्रश्नावली करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद व महिला परिषद तर्फे सामूहिक सामायिक व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पश्च्यात होते. सदर कार्यक्रमाचे मंगल पाठाने सांगता करण्यात आली.
यावेळी श्री श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघाचे अध्यक्ष प्रेमचंद गुलेच्छा, उपाध्यक्ष मंदनचंद कोचर, जेठमल गुलेच्छा, पारसमल गुलेच्छा, जसराज कोचर, जिनकुशलसूरि दादावाडी ट्रस्ट अध्यक्ष मांगीलाल संकलेचा, महेंद्र डागा, नरेश गुलेच्छा, अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद अक्कलकुवा शाखा अध्यक्ष मनोज डागा, उपाध्यक्ष अनिल गुलेच्छा, सचिव शुभम भंसाली, अड. गजेंद्र भंसाली, अनिल चोपडा, कुशल गुलेच्छा, आदि समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.








