नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा महिला बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नंदुरबार मार्फत नवापुर तालुक्यातील बालहाट गावातील नियोजित बालविवाह थांबविण्यात आला.
नवापुर तालुक्यातील बालहाट येथे 13 मे 2022 रोजी बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे संबंधित गावातील अंगणवाडी सेविका पोलीस पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवर संपर्क साधत अल्पवयीन मुला-मुलींच्या वयाबाबत खात्री केली.
विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांच्या सोबतही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पोलीस संरक्षण मिळणे बाबत विनंती केली. प्रत्यक्ष एक पत्र देवून पोलीस संरक्षण घेत सदर गावात जिल्हा बाल संरक्षण कक्ष टीम आणि जन साहस टीम दाखल झाली.सदरच्या बालविवाह मध्ये मुलाचे वय 20 वर्ष पूर्ण, मुलीचे वय पंधरा वर्ष दहा महिने इतके आहे.
बालाहाट येथे मुलाच्या घरी जाऊन मुलाचे आई, वडील,नातेवाईक, सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी ताई, आशा ताई, गावातील जेष्ठ नागरिक यांना एकत्रित केले. त्यांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्याची जाणीव त्यांना करून दिली.
बालविवाहाचे दुष्परिणाम बाबत संबंधितांना माहिती देण्यात आली.बाल विवाह प्रतिबंधक कायदा मधील शिक्षेच्या तरतुदी याबाबत संबंधितांना अवगत करण्यात आले. गाव बाल संरक्षण समिती ॲक्टिव पणे काम करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना करण्यात आल्या.बालाहाट येथील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून बालविवाह थांबवण्याबाबत चे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करताना च व्हिडिओ तयार करण्यात आला. सदर बालकाला आणि त्याच्या पालकांना आवश्यक कागदपत्र सहित बालकल्याण समितीला सादर करण्याचे तोंडी सूचना देण्यात आले आहेत.गावातील सरपंच पोलिस पाटील अंगणवाडी सेविका आणि ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही हा बालविवाह थांबविला असून यानंतर आमच्या गावात कोणताही बालविवाह आम्ही होऊ देणार नाही याबाबतची आश्वासन देखील जिल्हा बाल संरक्षण कक्ष ला दिलेला आहे.बालकाला आणि त्याच्या पालकांना समुपदेशन केले. त्यानंतर बालिकेच्या गावाला नानागी पाडा येथे झाले.
गावातील सरपंच पोलिस पाटील इतर नागरिक सह बालिका आई वडील यांच्यासोबत संवाद साधत सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. बालिकेचे समुपदेशन तिचा स्थानिक बोली भाषेत जन साहस संस्था समुपदेशक आणि बाल संरक्षण अधिकारी रेणुका मोघे यांनी केले.संबंधित पालकांना बालिकेला आवश्यकता कागदपत्र सहित बाल कल्याण समिती समोर सादर करण्याचे सूचना देण्यात आले.संबंधित गावकऱ्यांना घटनेचे गांभीर्य बालविवाह प्रतिबंधक, कायदा, बालविवाहाचे दुष्परीणाम, मुलांसाठीच्या वेगवेगळ्या योजना, शिक्षण हमी कायदा, पोक्सो कायद्यातील काही संदर्भ सांगून गावात येणाऱ्या काळात अशा प्रकारचे बालविवाह होऊ नयेत यासाठी गावपातळीवरच गाव बाल संरक्षण समिती ,शाळा व्यवस्थापन समिती आणि शासनाच्या गाव पातळीवरील यंत्रणांनी(अंगणवाडी ताई,आशा ताई,पोलीस पाटील,शिक्षक, ग्रामपंचायत) करावे असे आवाहन करण्यात आले.बालिकेच्या गावातील सरपंच यांच्याकडून संबंधित गावाला आणि संपूर्ण जिल्ह्यात बालविवाह न करण्याबाबतचे आव्हान एक छोटासा व्हिडीओ क्लीप काढून करण्यात आले.संबंधित बालक आणि बालिका ज्या शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेतील शिक्षक , गाव बाल संरक्षण समिती, यांच्या संपर्कात राहून बालिका 18 वर्षापर्यंत आणि पुढेही शिक्षण घेईल यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून सतत पाठपुरावा केला जाणार आहे.सदर कार्यवाही प्रसंगी जिल्हा बाल संरक्षण कक्ष चे गौतम वाघ (PO -Ic) ,रेणुका मोघे (PO-NIC), जन साहस संस्थेचे जिल्हा समनव्यक विकास मोरे, कार्यकर्ती प्रियंका पाडवी उप स्थित होते.