नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चेडापाडा येथे आ. शिरीषकुमार नाईक तसेच जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक यांच्या उपस्थितीत रोजगार हमी योजना (मनरेगा) कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी चेडापाडा गावाच्या सरपंच श्रीमती इलूबाई वसावे यांच्या हस्ते आमदार शिरीष नाईक यांचा सत्कार केला. तसेच अजित नाईक यांचा सत्कार ग्रा.पं. सदस्य, अजित वसावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामावर उपस्थित सर्व 430 जॉब कार्डधारक मजूर व ग्रामस्थ यांना आमदार शिरीष नाईक यांनी सदर योजनेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. अविनाश मावची, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, उमराण, ग्रामसेविका श्रीमती एल.एफ. गावित, ग्रा. पं. सदस्या श्रीमती प्रियंका गावित, मणिलाल शांतू वसावे, श्री. दिलीप वळवी व इतर ग्रा. पं. सदस्य तथा सदस्या तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.