म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथे हेरंब गणेश देवस्थानाच्या समाज भवनात पारधी समाजाचा जनजागृती मेळावा नुकताच संपन्न झाला.
मेळाव्याला अध्यक्ष म्हणून पारधी समाजाचा इतिहास आणि पारध पारधी समाजाचे प्रबोधन करणारे नामदेव भोसले होते. मेळाव्याला मार्गदर्शन करतांना नामदेव भोसले यांनी पारधी समाजाचा विकास शिक्षणातूनच साधला जाऊ शकतो. सर्व समाजाने एकत्रित येऊन समाजासाठी काम करायला हवे असे सांगितले. तसेच पारधी समाजाचा इतिहास सांगताना क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांचा जीवनपट सांगून जयनगर येथे नियोजित जागेत समशेर सिंग पारधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल असे सांगितले.
पी. आय. राजेश शिरसाठ यांनी जुन्या काळातील गुन्हेगारी व सद्य परिस्थितीतील परिस्थितीवर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन पारधी, छगन पारधी, जगन पारधी यांनी केले होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पारधी समाजाचे तरुण मंडळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील आजी – माजी पदाधिकाऱ्यांचा समवेत संतोष पारधी, आत्माराम नगराळे, रामदास नगराळे, ईश्वर माळी, प्रताप पारधी, शिवाजी पारधी, दीपक गोसावी, विठोबा माळी, दशरथ पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माध्यमिक शाळेचे मुख्यध्यापक आय.डी माळी यांनी केले होते.