नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील सावरट ते चिंचपाडा गावादरम्यान ट्रॅक्टरट्रॉली खड्ड्यात उलटल्याने एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील जुनी सावरट येथील अविनाश गेमू नाईक हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र.एम.एच.४१ डी ५४९८) व ट्रॉलीमध्ये (क्र.एम.एच.१८ ए ८८७७) मजूरांसह विटा भरुन सावरट ते चिंचपाडा रस्त्याने जात होते. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन एका हॉटेलसमोर असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॉलीचे चालक गेल्याने ट्रॉली उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात बाबु जानक्या नाईक रा.नवी सावरट ता. नवापूर हे ठार झाले तर अमृत इतक्या नाईक, जहागू विजा नाईक दोघे रा.नवी सावरट ता.नवापूर, अमृत नोपऱ्या नाईक रा.कोळदा ता.नवापूर, भावू वाल्या रा.सुळी ता.नवापूर हे जखमी झाले. याबाबत अनिल बाबु नाईक यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अविनाश नाईक याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.