नवापूर ! प्रतिनिधी
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली तसेच पारस मिरॅकल अहमदनगर आणि जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सर्व प्राध्यापकांना जलनेती चे प्रात्यक्षिक करून जलनेती चे पात्र मोफत वाटण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी योगशिक्षक डॉक्टर नितीन कुमार माळी व श्रीमती नीलिमा माळी यांना प्राचार्य डॉक्टर ए.जी. जयस्वाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. छाया गावित, पाहुण्यांचा परिचय एकनाथ गेडाम तर आभार ए.ए. मुळे यांनी मानले. सर्व योग वर्गाचे व जलनेती चे संचलन जोशाबा सरकार युवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.नितीनकुमार माळी तर आभार नीलिमा माळी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व कर्मचऱ्यांना जलनेतिचे पात्र मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोशाबा सरकार युवा मंडळाचे संचालक तसेच उपप्राचार्य युवराज भदाणे, डॉ. छाया गावित, एकनाथ गेडाम, डॉ. विजय पाटील ,आर.आर. पाठक, ए.ए.मुळे, प्रकाश बाविस्कर, राहुल तुपे, हिरालाल वसावे ,जयंतीलाल गारोळे ,रूपाली गारोळे हरीश तांबोळी ,योगिता तांबोळी,यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार तसेच उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष परमपूज्य शिवानंद महाराज, अहमदनगरचे प्रेरणा नाबारिया यांचे मार्गदर्शन लाभले