म्हसावद l प्रतिनिधी
महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती व जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कोठली ता.शहादा येथे युवकमित्र परीवार तर्फ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 20 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्यादेवी रावल यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोकुळबाई पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच ठाणसिंग गिरासे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त आसाराम माळी, पोलीस पाटील सूकदेव पाटील,राजेंद्र बाबूसिंग गिरासे हे होते.
शिबिराच्या सुरवातीस महाराणा प्रतापसिंह यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.सालाबादप्रमाणे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती व जागतिक रेडक्रॉस दिननिमित्त दरवर्षी कोठली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.या वर्षी शहादा ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सदर शिबीराचे आयोजन युवकमित्र परीवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,युवकमित्र परिवाराचे समन्वयक बादलसिंग गिरासे,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गिरासे,सरदारसिंग गिरासे,उमेश माळी, गोकुळ माळी, राहुल राजपूत, दिपकसिंग गिरासे यांनी केले होते.रक्त संकलनकामी शहादा ब्लड बँकेचे डॉ.नजीम तेली व स्टाफचे सहकार्य लाभले.आभार बादलसिंग गिरासे यांनी मानले.