Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे १६ ते २५ मे दरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

team by team
May 11, 2022
in राज्य
0
नंदुरबार येथे १६ ते २५ मे दरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

नंदुरबार l प्रतिनिधी
येथे बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा यांच्यावतीने दि.१६ ते २५ मे २०२२ दरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनासाठी नंदुरबार जिल्हा बालरंगभूमी परिषदेची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाट्यकर्मी मनोज सोनार हे होते. या बैठकीदरम्यान नाट्यकर्मी रवीदा जोशी, नागसेन पेंढारकर, रवींद्र कुलकर्णी आदींनी आपले विचार मांडले. या बैठकीत बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे दिनांक १६ ते २५ मे २०२२ दरम्यान शहरातील चिंतामणी एज्युकेशन सोसायटीचे राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे जिल्ह्यातील बालकलावंतासाठी नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
या नाट्य प्रशिक्षण शिबिरात वय वर्ष ८ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून सदर नाट्य प्रशिक्षण शिबीरात ४० बालकलावंतांना सहभाग मिळणार आहे. या नाट्यप्रशिक्षण आधारे नंदुरबार जिल्ह्यातील बाल कलावंतांना नाट्य अभिनयासोबत नाटकातील विविध अंगांची ओळख होणार आहे. या बैठकीत राजेश जाधव, राहुल खेडकर, आशिष खैरनार, चिदानंद तांबोळी, सागर कदम आदी उपस्थित होते. या नाट्य प्रशिक्षणासाठी या बालनाट्य प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी सातशे रुपये स्वागतमूल्य आकारण्यात येणार असून नाट्य प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी नागसेन पेंढारकर ९९२३१२९७८२, राहुल खेडकर (९४२२७८७३३५), संतोष पाटील (९५५२२२२७७७), तुषार ठाकरे (९४०३१२३४७८), राजेश जाधव (९९२२०३३५११) यांच्याशी संपर्क साधावा व बालकलावंतांनी लवकरात लवकर बालनाट्य प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन बाल रंगभूमी परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धुळे व नंदुरबार जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची बिनविरोध निवड

Next Post

वल्लभाचार्य प.पु १०८ व्रजराजकुमार महाराजांचे आगमन; शैक्षणिक,समाजकार्यासाठी मंथन, आज ब्रह्मसंबंध, जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add