नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा न्यायालय कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची बिनविरोध निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी धुळे जिल्हा न्यायालयातील भरत शिरसाठ तर व्हाईस चेअरमनपदी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक गोविंद उत्तम भामरे यांची निवड झाली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेची निवड प्रक्रिया घेण्यात आली. या निवड प्रक्रियेत पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड करण्यात आली. त्यात धुळे जिल्हा न्यायालयातील भरत शिरसाठ यांची चेअरमनपदी तर नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक गोविंद उत्तम भामरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गोविंद उत्तम भामरे हे नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयात रोख व वित्त विभागात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत आहे. पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गोविंद भामरे यांचा नंदुरबार जिल्हा न्यायालयातील प्रबंधक व कर्मचार्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.