म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ नंदुरबार डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 5 मे ते 20 मे या दरम्यान कराटे प्रशिक्षण घेण्यात येत आहे , या निमित्ताने वृदांवन नगर ,शहादा येथे उन्हाळी क्रीडा कराटे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या कराटे शिबिराचे उद्घाटन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस , तथा जिल्हा परिषद सदस् मोहन शेवाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या प्रसंगी क्रीड़ाशिक्षक युवराज राठोड, क्रीड़ा सहायक खगेंद्र कुंभार, रविंद्र सुर्यवंशी, रामा हटकर , कराटे चे जिल्हा सचिव डॉ.दिनेश बैसाणे आणि प्रशिक्षक करण निकुंबे, कमलेश कुडके, शहादा तालुक्यातील मुख्य कराटे प्रशिक्षक शुभम कर्मा आदि उपस्थित होते .