नंदुरबार l प्रतिनिधी
मशिदीवरचा भोंगा , हनुमान चालीसा यावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे देशात वातावरण दुषित झाले आहे . मात्र , दुसरीकडे नंदुरबारमध्ये देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या गावात हिंदू – मुस्लीम ऐक्याचे दर्शन पाहायला मिळत आहे . यामुळे लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जिवंत असल्याचे दिसून येत आहे . याच नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी गावचे सुपुत्र असलेल्या डॉ. आशिष अग्रवाल यांनी एका देशभक्तीपर मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे . या चित्रपटाची निर्मिती करून अग्रवाल यांनी देशातील लोकांना ऐक्याचा संदेश दिला आहे . नंदुरबार , कोल्हापूर आणि पुणे येथील बालकलाकारांच्या अभियातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे .
‘ भारत माझा देश आहे ‘ असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे . देशसेवेसाठी समर्पित सैनिकांच्या गावातील एक परिवारावर हा देशभक्तीपर चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे . डॉ . आशिष अग्रवाल यांच्याद्वारा निर्मित या चित्रपटाचे स्पेशल शो नंदुरबारमध्ये आयोजन करण्यात आले होते . या चित्रपटाच्या शोसाठी चित्रपटातील बालकलाकारांसह अनेकांनी या स्पेशल शोला हजेरी लावली . नंदुरबारबारच्या मिराज सिनेमामध्ये या स्पेशल शोचे आयोजन केले होते . हा स्पेशल शो पाहिल्यानंतर अनेकांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले . चित्रपटात नंदुबार , कोल्हापूर आणि पुण्यातील बालकलाकारांनी या सिनेमात भूमिका केल्या आहेत . तसेच या चित्रपटात कोल्हापूरच्या राजवीर सिंह राजे आणि पुण्याच्या परी सावंत हिने महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत . दोन्ही बालकलाकारांनी मेहनीच्या जौरावर उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन केले आहे . दोघांनी चित्रपटात केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे . तसेच प्रेक्षकांनी चित्रपटातील बालकलाकारांचेही कौतुक केले.