नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध झाली. चेअरमनपदी एकनाथ (महाराज) भील यांची बिनविरोध निवड झाली.दरम्यान १२ पैकी १० जागेवर शिवसेनेचे उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता.
मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व दिपक मराठे, रविद्रं पवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास सोसायटी दहिदुंले १२ पैकी १० जागेवर शिवसेनेचे सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यात दिपक भागवत मराठे, रमेश इंदास वसावे, सुबास रामदास वळवी, अभिमन हरचंद पाडवी, सत्तर शामला भिल, देविदास नारायण वळवी, जमुनाबाई देविदास वळवी, एकनाथ भील आदींचा समावेश आहे. तर चेअरमनपदी शिवसेनेचे एकनाथ भील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल मा. प. स.सदस्य दिपक मराठे, नगरसेवक रविद्रं पवार यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी सर्व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी चेअरमन तसेच संचालक यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व सर्वत्र परिसरातून त्यांचावर आभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.








