खापर l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुंभार समाज संघटना चे प्रदेशाध्यक्ष, सतीश दरेकर व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेने तर्फे जिल्ह्यातील सर्वशाखीय कुंभार समाज बांधवांच्या जनगणनेस खापर तालुका अक्कलकुवा येथून पंच मंडळाचे चेअरमन कांतीलाल सुकलाल प्रजापती यांचा प्रथम फॉर्म भरून सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय संत गोरोबा काका यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ सोमा कुंभार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण, पंच मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल प्रजापति, जिल्हा सल्लागार व कोषाध्यक्ष रमण लाल प्रजापति ,जिल्हा उपाध्यक्ष छोटूलाल प्रजापति, आनंदा प्रजापति, पं च मंडळाचे सचिव, रोहिदास कुंभार, मनोज प्रजापती, रवींद्र प्रजापती आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय कुंभार समाजाची जनगणना होणे ही काळाची गरज आहे. जनगणनेमुळे समाजामध्ये शिक्षित सदस्य किती आहेत. मातीकाम करणारे , नोकरी करणारे , व्यावसायिक किती आहेत या सर्वांचा आपणास उलगडा होतो.
राज्याची जनगणना केल्याने आपणास जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, तालुक्याची लोकसंख्या किती आहे, आपल्या शहराची लोकसंख्या किती आहे.. या सर्वांचे आकलन होणार आहे म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवांनी जनगणनेच्या फॉर्म संघटनेच्या जिल्हा किंवा तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून भरून घ्यावा. अधिक माहिती साठी 97 67 06 23 35 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण, कार्याध्यक्ष भगवान कुंभार, सचिव प्राध्यापक बाळकृष्ण मोरे, व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








