नवापुर l प्रतिनिधी
तालुक्यातील केलवन पाडा गावातील 18 वर्षीय युवकाचा शेतात पाण्याची मोटार बोरिंग मध्ये टाकत असताना लोखंडी पाइप स्लीप झाल्याने मार लागून दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने गावात शोककळा पसरली.
सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील केलवण पाडा गावातील 18 वर्षीय युवक मैशक बाळू गावित बिलमांजरा शिवारातील रोत्या कुकड्या गावित यांच्या मालकीचे गट क्रमांक 8213 शेतात बोरिंग मध्ये पाण्याची मोटर टाकत असताना अचानक लोखंडी पाइप जोरात स्लीप झाला.तेथे लावलेले लाकडी दांडके अचानक येऊन त्याच्या मानेच्या उजव्या बाजूस व छातीजवळ जोरात ठोकले गेले यात मैशक बाळू गावित याला जोरात लागला त्याला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर बेंद्रे यांनी त्यांची तपासणी करून त्याला मयत घोषित केले या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली आहे 18 वर्षीय युवक शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








