नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे ट्रॅक्टर अंगावर चालवून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहाता तालुक्यातील खेडदिगर येथील जगदिश मोहन पाटील यांनी खरेदी केलेल्या शेतात सर्वे क्र.४८/१/अ/१ अ मध्ये ट्रॅक्टर चालक कल्टीव्हेटरने मशागत करीत होते. यावेळी ऋषिकेश रविंद्र पाटील याने विना नंबरचे हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर जगदिश पाटील यांच्या शेतात टाकून ट्रॅक्टरसमोर आडवे लावले. यावेळी जगदिश पाटील हे समजाविण्यासाठी गेले असता ऋषिकेश पाटील याने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून जिवेठार मारण्याच्या प्रयत्न केला. यावेळी ट्रॅक्टरचा हाताला धक्का लागल्याने दुखापत झाली आहे. तसेच दुर्गेश पाटील व योगेश पाटील यांनी शिवीगाळ करीत जगदिश पाटील यांना ट्रॅक्टर शेतात काढून घ्या नाही तर ट्रॅक्टर जाळून टाकेल अशी धमकी दिली. याबाबत जगदिश पाटील यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती पाटील करीत आहेत.








