नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
बैठकीस सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
विविध यंत्रणांनी यावर्षीच्या योजनांचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश श्रीमती खत्री यांनी दिले. शाळा, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. व्यायामशाळा आणि शाळांमधील स्वच्छतागृह बांधकामासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी कामांची जोडणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.