नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील गणपती मंदिर परिसरात असलेले दुकान फोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची रोकड चोरुन नेली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील हितेश अशोक जैन यांचे गणपती मंदिर परिसरात किराणा दुकान आहे. सदर बंद दुकानाचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानात असलेल्या लोखंडी कपाटातून ३० हजार रुपये किंमतीची रोकड चोरुन नेली. याबाबत हितेश जैन यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत मोहिते करीत आहेत.








