Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवाची लाकडी मुर्तीचे आमिष दाखवुन जबरीने पावणे दोन लाख लुटले, विशाखापट्टनम येथील एकाची नंदुरबार जिल्ह्यात लुट

team by team
May 8, 2022
in क्राईम
0
वडाळी – काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

नंदुरबार | प्रतिनिधी
तामिळनाडू राज्यातील विशाखापट्टनम येथील एकाला देवाची लाकडी मुर्तीची आमिष दाखवून विश्‍वास संपादन करून १ लाख ७२ हजाराची फसवणूक करून दुखापत करीत जबरी चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चार जणांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंगाली रविंद्र यादव रा.नंदामुरारीनगर विशाखापट्टनम (तामिळनाडू) हा जानेवारी २०२२ च्या सुरूवातीपासून अकोला स्टेशनपास केल्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांकावर करण पवार या इसमाने ५० हजार रूपयाची विष्णु भगवानाची एकलाकडी मुर्ती ही २५ हजाराचा देतो असे आमिष दाखवन जिंगाली यादव यांच्या विश्‍वास संपादन करून फोनपेद्वारे वेळोवेळी २० हजार रूपयापेक्षा जास्त रक्कम पाठविली. तसेच नंदुरबार शहरातील गौरवप्लाजा येथे दोनवेळा एक हजार रूपयाप्रमाणे पैसे घेवून त्यानंतर पुन्हा करण् पवार इसमाचा मित्र मनोज पवार याने तीच मुर्ती पाहिजे असल्यास दिड लाख रूपये लागतील असे सांगितले. त्यानंतर जिंगाली यादव याने नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एचडीएफसीच्या एटीएममधून पैसे काढून दिड लाख रूपये जमविले त्यानंतर दि.६ मे रोजी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास मनोज पवार तेथे आला व त्याने जिंगाली यादव याला मोटरसायकलवर बसून नेहरूचौक गांधीपुतळा येथून उड्डाणपुलवरून जात प्रकाशा येथील तापी नदीवरील ब्रीजकडे घेवून गेला. त्यानंतर खाली उतरून बरेच पुढे नेल्यानंतर मनोज पवार याचे दोन अनोळखी साथीदार त्याठिकाणी आले. त्यातील एकाने जिंगाली यादव याला सुरा दाखवून आम्हाला पैसे देवून टाका अशी धमकी देवून पोटात बुक्का मारला तर दुसर्‍याने जोरात लाथ मारत जिंगाली यादव याच्याकडील दिड लाख रूपये रोख व १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी जिंगाली रविंद्र यादव याच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोबाईल धारक करण पवार, मनोज पवार तसेच अज्ञात दोन अनोळखी इसमाविरूध्द भादंवि कलम ४२०, ३९४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कुंडल येथील युवतीला जिवे ठार मारणार्‍या नरामधमास अटक

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात रविवारी 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पाऱ्याची नोंद

Next Post
नंदूरबार जिल्ह्यात रविवारी 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पाऱ्याची नोंद

नंदूरबार जिल्ह्यात रविवारी 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पाऱ्याची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add