नंदुरबार ! प्रतिनिधी
तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याणच्या सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्याची तरतूद आहे. त्यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. पात्र तृतीयपंथीयांनी https://transgender.dosje.gov.in/Applicant/Login/Index (नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन) या संकेतस्थळावर ऑनलाईन लॉगीनवर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व माहिती भरावी.
ऑनलाईन अर्जासोबत पोस्टकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आधारकार्ड, तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ यांनी दिलेला अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.