राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी 8 वाजता चिमठाणा जि.धुळे येथून शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण. रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह, नंदुरबार येथे आगमन व मुक्काम.
रविवार 8 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथून वाहनाद्वारे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता नंदुरबार येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित ‘व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमास उपस्थिती व हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांना अभिवादन तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नंदुरबारकडे प्रयाण.दुपारी 12.40 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन व राखीव.
सोमवार 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजता आदिवासी विकास विभागामार्फत साजरा करण्यात येत असलेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती. नंदुरबार येथे राखीव.
मंगळवार 10 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजता कुपोषण संदर्भात जिल्हा प्रशासनासोबत बैठक.