Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३३ प्रलंबित तर दाखलपुर्वक १४९५ प्रकरणे निकाली २ कोटी ६९ लाख दंड वसुल

Mahesh Patil by Mahesh Patil
May 8, 2022
in सामाजिक
0
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३३ प्रलंबित तर दाखलपुर्वक १४९५ प्रकरणे निकाली २ कोटी ६९ लाख दंड वसुल

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३३ प्रलंबित प्रकरणे तर दाखलपुर्वक १४९५ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात एकूण २ कोटी ६९ लाख ९९ हजार ८५४ रूपये वसुल करण्यात आले.
राष्ट्रीयसेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाविधीसेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय नंदुरबार व तालुकास्तरावर काल शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवानी फौजदारी मोटार अपघात दावे कौटूंबिक हिंसाचार चलनक्षम दस्ताऐवज प्रकरणे यासह विविध प्रकरणे ठेवण्यात आली होती. सदर लोकन्यायालयाचा प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस.तिवारी, जिल्हाविधीसेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही.हरणे यांच्या उपस्थितीत लोकअदालत घेण्यात आली. यावेळी तर्द्थ जिल्हा न्या.एक एस.एस.भागवत, न्या. वरिष्ठस्तर एस.टी.मलिये, मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण, २ रे सहदिवाणी न्या.एन.बी.पाटील यांनी पॅनलप्रमुख काम पाहिले.
जिल्हाभरात झालेल्या राष्ट्रीयलोक अदालतीचे १७ प्रलंबित प्रकरणे निकाली निघाले. यात ११ लाख ३१ हजार ८४६ मोटर अपघात प्रकरणे १५ यात ५१ लाख ४० हजार चलनक्षम धनादेश प्रकरणी २९, ४१ लाख १२ हजार ८८०, कौटूंबिक वाद प्रकरणी फौजदारी प्रकरणे ९ यात एक हजार रूपये, इतर किरकोळ फौजदारी ३३६ यात ११ हजार ३६६ रूपये, बँक थकबाकी वसुली १९ प्रकरणे यात २९ लाख ४६ हजार ९५ असा प्रलंबित प्रकरणांमध्ये ४३३ प्रकरणे निकाली निघाले. यात १ कोटी ३४ लाख ४५ हजार ४२१ रूपये दंड वसुल करण्यात आला तर दाखलपुर्व प्रकरणांमध्ये ७१ बँक वसुली यात १ कोटी १४ लाख ६३ हजार २८९ रूपये, वीज थकबाकी वसुली १५ प्रकरणातून १ लाख ५७ हजार २३३ रुपये, पाणीपट्टी घरपट्टी थकबाकी वसुलीचे २२४ प्रकरणे यातून ८ लाख १३ हजार ७६ रूपये, बीएसएनएलचे १२ प्रकरणातून ७३ हजार ५३९ रूपये, ११६२ ई ट्राफीक चलन प्रकरणात १ लाख ३७ हजार असा एकूण दाखलपुर्वक १ हजार ४९५ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४३३ रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. काल झालेल्या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपुर्वक २९२८ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून यात २ कोटी ६९ लाख ९९ हजार ८५४ रूपये दंड वसुल करण्यात आला तसेच यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.डी.चौधरी, ऍड.यु.एच.केदार, श्रीमती एस.यु.खत्री, अविनाश पाटील, गणेश बैरागी, ऍड.दत्तात्रय कदमबांडे, श्रीमती विनया मोडक, आर.ए.मोरे, ए.बी.कढरे, पुष्पेंद्र पाटील, एन.एल.गिरासे, दिपाली रघुवंशी यांनी दाखलपुर्वक प्रकरणामध्ये पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. या लोकअदालतीच्या प्रसंगी नवनियुक्त न्यायीक अधिकारी ए.एस.बडगुजर, एस.बी.मोरे, ए.आर.कुलकर्णी, श्रीमती पी.एन.काजळे, आरती क्रिष्णा बनकर, एम.बी.पाटील, श्रीमती एस.आर. पाटील यांनी लोक न्यायालयाचे कामकाजाचे अवलोकन केले. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक एस.व्ही.जोशी, नंदुरबार वकिल संघाचे अध्यक्ष ऍड.पी.बी.चौधरी, श्रीमती जे.बी.ताडगे तसेच न्यायालयीन कर्मचारी व विधीतज्ञ यांचे मोलागचे सहकार्य लाभले. लोकन्यायालयात विविध प्रकरणे सामजस्याने निकाली काढण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

आयान साखर कारखान्याच्या मळीला लागलेल्या आगीत 11 कोटीचे नुकसान

Next Post

धडगांव वनविभागाची धडक कारवाई , कात्री येथे वाहतुकीच्या तयारीत असलेल्या सागवनाच्या दांड्या जप्त

Next Post
धडगांव वनविभागाची धडक कारवाई ,  कात्री येथे वाहतुकीच्या तयारीत असलेल्या सागवनाच्या दांड्या जप्त

धडगांव वनविभागाची धडक कारवाई , कात्री येथे वाहतुकीच्या तयारीत असलेल्या सागवनाच्या दांड्या जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group