नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील काळंबा शिवारामध्ये असलेल्या शेतकरी किकीबाई मधुकर गावीत यांच्या शेतात उभ्या ऊसाला शॉटशर्कीटमुळे आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आगीने रोद्ररुप घेतल्याने जवळच असलेले शेतकरी राजु गावीत यांनी नवापूर नगरपालिकेला दुरध्वनी वरुन माहीती देताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियत्रण मिळविले.
यामुळे शेतकरी किकीबाई गावीत यांचे सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.तसेच शेतातील बोरवेलचे पाईप जळुन गेली आहे. घटनास्थळी नवापूर तलाठी राजेंद्र साबळे, कमलेश भोई, यांनी घटनेचा पंचनामा केला.यावेळी प्रभाग क्र १० चा नगरसेविका महीमा गावीत उपस्थित होत्या. घटनास्थळी परिसरातील नागरिक बचावकार्यासाठी धावून आले होते.एकच गर्दी झाली होती. नवापूर परिसरात आगीच्या घटना अधूनमधून घडत असतात आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे.