नंदुरबार ! प्रतिनिधी
शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार असून त्या दृष्टीने तयारी पुर्ण करण्यात आली आहे . आधी ९ ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आली होती . परंतू पूर स्थिती आणि वाहतूकीची साधने उपलब्ध न होणे यामुळे ही परीक्षा आता १२ रोजी होणार आहे .
याबाबत माहिती देतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी सांगितले , ९ ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहे . त्यासाठी नंदुरबार जिल्हास्तरावर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे . ११ ऑगस्ट रोजी शिक्षकांना साहित्य वितरण केले जाणार आहे . अक्कलकुवा तालुक्यात पाचवीसाठी चार परीक्षा केंद्र असून ४८० विद्यार्थी तर आठवीसाठीही तीन केंद्र असून ३६० विद्यार्थी आहेत . धडगाव गटात पाचवीचे चार केंद्र आहेत .असून २८८ विद्यार्थी तर आठवीचे एक केंद्र असून १५५ विद्यार्थी आहेत . शहादा तालुक्यात पाचवीचे सहा केंद्र असून ७६२ विद्यार्थी आहेत तर आठवीचे सहा केंद्र असून ५७० विद्यार्थी आहेत . नंदुरबार तालुक्यात पाचवीचे १३ केंद्र असून २,५ ९ ३ विद्यार्थी तर आठवीचे १२ केंद्र असून ९ ८३ विद्यार्थी आहेत . तळोदा तालुक्यात पाचवीचे तीन केंद्र असून ३५८ विद्यार्थी तर आठवीचे दोन केंद्र असून १ ९ ५ विद्यार्थी आहेत . नवापूर तालुक्यात पाचवीचे चार केंद्र असून ५३० विद्यार्थी तर आठवीचे चार केंद्र असून ३३० विद्यार्थी आहेत . दरम्यान , परीक्षा नियंत्रण व नियोजनासाठी जिल्हाधिकारी मनिषा खत्री , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचेही डॉ.राहुल चौधरी यांनी सांगितले .