नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील लहान चिंचपाडा गावाजवळ नवापूर नगर पालिकेचे घनकचरा प्रकल्प आहे.या कचरा डेपोमध्ये सायंकाळी ६ वाजेचा सुमारास आग लागल्याची माहीती एम.आय.डी.सी.चे कर्मचारी यांनी दिली.
रात्री ९ नंतर आगीने रौद्र रुप घेतले या बाबतची माहीती नवापूर नगरपालिकेला मिळताच त्यांनी अग्निशामन बंबच्या सहाय्याने आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला मात्र दि ६ मे रोजी दुपारी १२ वाजे पर्यत आग सुरु होती.याठिकाणी आग लागण्याचा प्रकार हा दुसऱ्यांदा झाला आहे.या आगीमुळे एम.आय.डी.ची सर्व संच बंद करावे लागले होते.या बाबत नवापूर नगरपालिकेत एम. आय.डी.सी. संच मशिनचे मालक प्रदिप भगासीया व योगेश भावसार यांनी जाऊन या बाबत संपुर्ण माहीती आरोग्य निरीक्षक अशोक साबळे यांना दिली.त्यांनी सांगितले की या घनकचरा प्रल्कपाला नेहमी आग लागत असते या आगीचा धुळ आमचा एम.आय.डी.भागात येतो यामुळे आम्हाला मोठा त्रास होतो. आगी मुळे आम्हाला एम.आय.डी.सी. बंद करावी लागते.काल आम्हाला श्वास घेण्यासाठी पण त्रास होत होता.या बाबत ची तक्रार लहान चिंचपाडा गावाचा रहीवाशांनी पण नवापूर नगरपालिकेला दिली आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांनी कचरा घनकचरा प्रकल्पात टाकायाला पाहीजे पण हे कर्मचारी रस्त्याचा बाजुला कचरा टाकत असतात. यामुळे करंजी बु,धनराट,सोनखडका या गावाकडे जाणा-या ग्रामस्थांना पण याचा ञास होत आहे. नवापूर नगरपालिकेने याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.