नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील ब्राह्मणवाडीत समस्त ब्राह्मण पंच तर्फे सामुदायिक उपनयन संस्कार कार्यक्रम घेण्यात आला. यात १४ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे पौरोहित्य मधुकर जोशी, प्रदीप गर्गे यांनी केले. बटूमध्ये नंदुरबारचे ९,धुळेचे २ तर सटाणा,साक्री,शहादा येथील प्रत्येकी १ बटू होते.यावेळी समस्त ब्राह्मण पंचाचे अध्यक्ष अजित कुलकर्णी,उपाध्यक्ष शेखर कोतवाल,सचिव जयंत शुक्ल,सहसचिव महेश भट,खजिनदार श्रीराम मोडक, सदस्य विवेक फुलंब्रीकर, प्रशांत पाठक नीलेश व्यास, संजय फुलंब्रीकर, मिलिंद झेंडे, मेघश्याम भोंगे,जय मोडक,प्रग्नेश दवे, मुकुंद राळेगावकर, योगेश व्यास,यांचेसह बटूचे आई-वडील व नातेवाईक उपस्थित होते.