नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनी येथे ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीस नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास ५० हजाराचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि.१८ मे २०२१ रोजी सायंकाळी ५.१५ ते ५.३० वाजेच्या सुमारास शहरातील जुनी सिंधी कॉलनी येथे आरोपीच्या घरात घडली होती . फिर्यादी महिला या पती, सासु व दोन मुली असे कुटुंबासह एकत्र राहत असुन फिर्यादी यांचे पतीचे इलेक्ट्रिकचे दुकान असून त्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . दि.१८ मे २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला यांची ५ वर्षीय मुलगी हिस चॉकलेट खायचे असल्याने तिने तिच्या आईला सांगितले होते . तेव्हा फिर्यादी यांनी त्यांची मुलगी हिस चॉकलेट घेण्यासाठी १० रुपये देवुन घराजवळच असलेले अनिल आत्माराम गुरुबक्षाणी यांच्या दुकानावर चॉकलेट घेण्यासाठी पाठविले होते . मुलगी २० मिनिटे होवुनही घरी न आल्याने फिर्यादी महिला व त्यांचे पती मुलगीस गल्लीत शोधत असतांना मुलगी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी यांच्या घराकडुन रडत येत होती . त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या पतीने मुलगी हिस रडण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की , मी दुकानावर चॉकलेट घेण्यास गेली होती . त्यावेळेस दुकानात असलेल्या काकांनी मला घरात बोलावुन माझे कपडे काढुन माझ्यावर अत्याचार केला . असे सांगुन रडत होती . तेव्हा पिडीत मुलीचे आईने मुलीस घरी नेवुन तिचे कपडे काढुन तपासले.त्यावेळी फिर्यादी महिला यांना मुलगी हिच्यावर आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने चॉकलेट देण्याचे बहाण्याने घरात बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचे लक्षात आले होते . त्यानंतर फिर्यादी महिला हया त्यांचे पती व पिडीत मुलीसह उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याच्याविरुध्द तक्रार द्यायला आले होते . फिर्यादीच्या तक्रारीवरुन वर नमुद घटनेचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता .सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते . तसेच सदरचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी , पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांनी गुन्हा तात्काळ दाखल करुन आरोपीतास अटक करुन तपासात सहाय्य केले होते . सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार आर . एस . तिवारी यांच्या कोर्टात होवुन आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी रा . जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार यांच्या विरुध्द बा . लै . अ.का.क. ( पोक्सो ) १० अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस ७ वर्ष सश्रम कारावास व ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील ऍड. विजय सी. चव्हाण व फिर्यादी पक्षातर्फे ऍड. पी . आर. जोशी यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे . तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे .