नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळा आणण्याच्या मिरवणुकीत तसेच रामनवमी रॅलीत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शहादा शहरात नुकताच बसविण्यात आलेल्या शिवाजी महाराज पुतळा मिरवणुक वेळी तसेच रामनवमीच्या पुर्वसंध्येला निघालेली मोटार सायकल रॅली आणि रामनवमीनंतरच्या बंद दरम्यान शिवभक्त तसेच रामभक्तांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. या तीन कार्यक्रमात शहाद्यातील अनेक युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा आणण्याच्या मिरवणुकीत तसेच रामनवमी रॅलीत दाखल झालेले गुन्हे खऱ्या अर्थान शिवप्रेमींची हिरमोड करणारे असल्याने शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना मेलकरुन सदरची मागणी केली आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्याची भेट घेवुन गुन्ह्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.