नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील नगरपालिकेतर्फे अल्पदरात शुद्ध पेयजल योजनेच्या शुभारंभ माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेतर्फे शुद्ध पेयजल योजनेंतर्गत अल्पदरात शुद्ध व थंड पाणी वाटप सेवेचा येथील सुभाष चौकात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या योजनेमध्ये नागरिकांना एका रुपात १ लिटर, ५ रुपये ९ लिटर, १० रूपात १८ लिटर, तसेच कार्ड द्वारे १२ रुपयात २० लिटर पाणी नागरिकांना मिळणार असून या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचा मानस असुन यासोबत एक फिरती मोबाईल व्हेन द्वारे देखील शहरात नागरिकांची तृष्णा भागविण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे श्री रघुवंशी यांनी सांगीतले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, अशोक राजपूत, गजेंद्र शिंपी, प्रमोद शेवाळे, जगन माळी, मोहिनीराज राजपूत ,संजय भदाने, किरण चौधरी, मोहित राजपूत, प्रताप राजपूत, चंदू पाटील, यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते. शहादा येथील सु- प्रकाश इंटरप्राईजेस यांच्यामार्फत ही सुविधा पुरविण्यात येत आहे.