नंदूरबार l प्रतिनिधी
विजवितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यास मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 26 मार्च 2018 रोजी सकाळी 11:30 वाजेचे सुमारास नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्यीत तलावपाडा ता.जि. नंदुरबार येथे घडली होती.फिर्यादी विज वितरण कंपनीचे सहा अभियंता असुन ते व साक्षीदार कर्मचारी हे तलावपाडा येथे विजबिल वसुलीकामी व विज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेले असता आरोपी क्र.1 संजय जगन ठाकरे व क्र.2 राजु राजाराम भिल यांनी फिर्यादी व सोबत असलेले कर्मचारी यांना धक्काबुक्की करुन जिवेठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता म्हणून दोन्ही आरोपीतांना नंदुरबार जिल्हा अति.सत्र न्यायालयाने 3 महिने कारावास व प्रत्येकी रुपये 2 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
फिर्यादी विज वितरण कंपनीचे सहा अभियंता देवेंद्र हरीप्रसाद व्यास हे त्यांचे स्टॉफसह तलावपाडा ता.जि. नंदुरबार येथे विजबिल वसुलीकामी,विज पुरवठा खंडीत करण्यासाठी तसेच विजबिल भरण्याचे आवाहन करण्यासाठी गेले होते.तेव्हा फिर्यादी सहा अभियंता देवेंद्र हरीप्रसाद व्यास यांनी संजय जगन ठाकरे व राजु राजाराम भिल दोन्ही रा.तलावपाडा ता. जि.नंदुरबार यांना सांगितले की, “तुमच्याकडे राहीलेले थकीत बिल तुम्ही भरुन दया.”आरोपी संजय ठाकरे व राजु भिल यांना त्याचे वाईट वाटुन त्यांनी सहा.अभियंता देवेंद्र हरीप्रसाद व्यास यांना शिवीगाळ करु लागले व अंगावर धावत येत असतांना त्यांचे सोबत असलेले स्टॉफमधील कर्मचारी रतिलाल चौरे यांनी फिर्यादी व्यास यांना वाचविण्यासाठी आले असता आरोपी क्र. 1 संजय जगन ठाकरे व क्र.2 राजु राजाराम भिल अशा दोघांनी फिर्यादी देवेंद्र व्यास व रतिलाल चौरे अशा दोघांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती व ठार मारण्याची धमकी दिली होती.यावरुन फिर्यादी सहा.अभियंता देवेंद्र हरीप्रसाद व्यास यांनी स्वत:नंदुरबार शहर पोलीस ठाणेत तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदा पाटील,से.नि.तत्का.नेम, नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांनी करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.सदर खटल्याची सुनावणी आशुतोष भागवत, अति.जिल्हा व सत्र न्यायाधी यांच्या कोर्टात होवुन आरोपी क्र.1 संजय जगन ठाकरे व क्र.2 राजु राजाराम भिल दोन्ही रा. तलावपाडा ता.जि. नंदुरबार यांचे विरुध्द गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने आरोपी क्र.1 संजय जगन ठाकरे व क्र.2 राजु राजाराम भिल यास भा.द.वि.क. 353,332,504,506 अन्वये 3 महिने साधा कारावास व प्रत्येकी रुपये 2 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.बी.यु. पाटील यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ/नितीन साबळे व पोना/गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे.तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक,नंदुरबार विजय पवार यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे.