नंदुरबार l प्रतिनिधी
शासकीय कामात अडथळा निर्माण करून दुखापत करणाऱ्या वैंदाणे ता.जि.नंदुरबार येथील आरोपीस न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 20 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन हद्यीत वैंदाणे ता. जि.नंदुरबार येथे घडली होती. तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे त्यांच्या स्टॉपसह पुर्वी दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीतांना नोटीस बजावण्याकामी गेले असतांना तेथे येवून कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वैदाणे गावातील आरोपी संजय रावण पाटील यास नंदुरबार जिल्हा अति सत्र न्यायालयाने 3 महिने कारावास व रुपये 2000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे.दि.4 जानेवारी 2019 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.क. 143,147,148, 149,504,506 प्रमाणेचा गुन्हा दाखल आहे.त्याअनुषंगाने नंदुरबार तालुका पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे त्यांचे स्टॉपसह वरील गुन्हयात नोटीस बजावण्या कामी वैंदाणे ता. जि.नंदुरबार या गावात दुपारी 12:30 वाजता गेले होते.गावात पोहचल्यावर वैंदाणे गावाचे पोलीस पाटील यांना सोबत घेवून पोलीस स्टॉफसह पांडुरंग रघुनाथ पाटील व त्यांच्या घरातील 4 सदस्यांना वरील गुन्हयाकामी सीआरपीसी 41(अ) प्रमाणेची नोटीस बजावणी कामी पांडुरंग पाटील यांच्याघरी जावून विचारपुस करीत असतांना संजय रावण पाटील रा.वैदाणे ता. जि.नंदुरबार हा तेथे अचानकपणे मोटारसायकलवर येवून त्याने पांडुरंग पाटील व त्यांच्या घरातील सदस्यांना सांगितले की,कोणीही नोटीसवर सही करायची नाही,कोण कुठे आहे सांगायचे नाही,मी या पोलीस स्टेशनवाल्यांना पाहुन घेईल.”असे बोलुन चिथावणी देवू लागला होता.त्यावेळी फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी त्यास समाजावुन सांगितले होते.परंतु तो पोलीसांना शिवीगाळ करु लागला,त्याने पोलीस अधिकारी गणेश पवार यांचे हातातील नोटीस हिसकावून भिरकावुन दिल्या होत्या, तसेच आरोपी संजय रावण पाटील याने गणेश पवार यांचे अंगावर येवून त्यांची शर्टाची कॉलर पकडली व शिवीगाळ करून बोलू लागला की,तु कशाला सारखे माझे गावात येतो व माझे माणसांना नोटीस का देतो ? आणि आज तुला पाहुनच घेतो.”असे बोलून आरोपी संजयने गणेश पवार यांना धक्काबुक्की केली होती व त्याचे हातातील स्क्रू ड्रायव्हर सारखे दिसणारे वस्तुने पोलीस अधिकारी गणेश पवार यांचे हातावर मनगटाजवळ मारले होते.त्यामुळे पोलीस अधिकारी गणेश पवार यांना दुखापत झाली होती.त्यावेळेस गणेश पवार यांच्यासोबत असलेल्या पोलीस अंमलदारांनी आरोपी संजय रावण पाटील यास ताब्यात घेवून नंदुरबार तालुका पोलीस ठाणेत आणले होते. यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी स्वत: नंदुरबार तालुका पोलीस ठाणेत तक्रार दाखल केली होती.सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे,तत्का,नेमणूक नंदुरबार तालुका पोलीस ठाणे यांनी करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.सदर खटल्याची सुनावणी आशुतोष भागवत, अति,जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांच्या कोर्टात होवुन आरोपी संजय रावण पाटील रा.वैंदाणे ता.जि. नंदुरबार याच्या विरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने आरोपी संजय रावण पाटील यास भा.द.वि.क.353, 332,504,506अन्वये 3 महिने साधा कारावास व रुपये 2 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.बी.यु. पाटील यांनी पाहीले असून खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ नितीन साबळे व पोना/ गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे.तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक,नंदुरबार विजय पवार यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे.