नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात मनसेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात श्री प्रेस मारुती मंदिरात महाआरती व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसाचे पठण करावे असा इशारा कार्यकर्त्यांना दिला होता. त्या अनुषंगाने शहादा शहरातील श्री प्रेस मारुती मंदिरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मनसे कार्यकर्त्यांच्यावतीने महाआरती व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालीसाचे पठण सुरूच राहणार असल्याचा इशारा काल दिला होता. त्या अनुषंगाने शहादा येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करत मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात हनुमान चालीसा पठण केले. दरम्यान जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी मनसे शहादा विभागीय अध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या सह शहादा शहरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.