शहादा ! प्रतिनिधी
येथील तालुका एज्युकेशन संस्था संचलित शेठ व्ही. के.शाह प्राथमिक विद्यालयात सर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांना मुख्याध्यापिका श्रीमती शोभना पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षिका श्रीमती मंगला चव्हाण, शिक्षिका श्रीमती वसईकर अन्य शिक्षिका उपस्थित होत्या. कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असेल तरी शासनाच्या नियमानुसार अद्याप प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. केवळ शिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी उपस्थिती आवश्यक केली आहे. शासनामार्फत पुरवण्यात आलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या पालकांना दिले जात आहे विद्यार्थ्यांना न बोलवता पालकांना बोलवून पुस्तके वाटप केली जात आहेत.
सर्व पुस्तकांचे सॅनिटायझर करण्यात आलेली आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स पाळून संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील, संचालक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके दिली जात आहेत. म्हणजे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी वंचित होणार नाहीत