म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील आवगे- पिंप्री दरम्यान ट्रॅक्टर ने दुचाकीस्वराला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्यासुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की,सुभाष रामसिंग चौधरी ( वय ३६ )हे आपल्या गावी पिंप्री येथे जात असताना समोरून ट्रॅक्टर ने जबर धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना स्थळावरून ट्रॅक्टर चालक हा पसार झाला असून म्हसावद येथिल ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करुन रात्री उशिरा नातेवाईकांना मृत्य देह ताब्यात देण्यात आला .ट्रॅक्टर चालकाविरुद्ध म्हसांवद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.








