नंदुरबार l प्रतिनिधी
क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक, जगत ज्योती, महात्मा बसवेश्वर यांचे कार्य शतकानुशतके समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आजच्या युवा पिढीने देखील सामाजिक समतेचे जननायक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन विधान परिषदेचे माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.
नंदुरबार येथील बालवीर चौकात महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बसवेश्वर महाराज यांच्या 891 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विधानपरिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गवळी समाजाच्या कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र बसव परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन भाग्यश्री अशोक यादबोले या विद्यार्थिनीने केले. अभिवादन कार्यक्रमास कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील, जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, प्रा गंगाराम यादबोले, भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे रामकृष्ण मोरे, जगन खेडकर, विनोद विठ्ठल चौधरी, सुमानसिंह राजपूत, चेतन राजपूत, दीपक गोडळकर, हेमंत नागापुरे, यमाजी गवळी, ॲड. सुशील गवळी, विजय चौधरी, भास्कर रामोळे, वैभव करवंदकर, अतुल पतंगपूरे, डॉ. गणेश ढोले, डॉ, भूषण पालकडे, कैलास ढोले, ईश्वर घुगरे, बाबा यादबोले आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी हिरणवाळे, गोपाल गवळी, प्रफुल्ल राजपूत, विशाल हिरणवाळे, सिद्धेश नागापुरे, आनंदा गवळी आदींनी परिश्रम घेतले. आभार अशोक यादबोले यांनी मानले.










